|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पीओकेतून आलेल्या कुटुंबांना 5.5 लाखांची मदत

पीओकेतून आलेल्या कुटुंबांना 5.5 लाखांची मदत 

नवी दिल्ली

 केंद्रीय मंत्रिमंडळाने पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या 5300 विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी 5.5 लाख रुपयांच्या मदतनिधीला मंजुरी दिली आहे. या पुनर्वसन पॅकेजमध्ये प्रारंभी जम्मू-काश्मीरबाहेर वसलेले पण पुढील काळात राज्यात स्थायिक झालेल्या पीओकेच्या विस्थापित कुटुंबांना सामील करण्यात आले आहे. 2016 मध्ये पुनर्वसनासाठी मोदी सरकारने घोषित केलेल्या योजनेत या कुटुंबांचा समावेश नव्हता.

पंतप्रधानांनी पीओकेच्या विस्थापितांसाठी 5.5 लाख रुपये प्रतिकुटुंबाच्या पॅकेजची घोषणा केली होती. पण या योजनेत 5300 कुटुंबांचा समावेश होऊ शकला नव्हता. ही कुटुंबे प्रारंभीच्या काळात जम्मू-काश्मीरबाहेर वास्तव्यास असल्याने त्यांना मदत मिळू शकली नव्हती. पण नव्या निर्णयामुळे 5300 कुटुंबांना योजनेत सामील करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक प्रकारचे विस्थापित समूह आहेत. 1947 नंतर दाखल झालेल्या विस्थापितांचा दुसरा गट यात समाविष्ट आहे.