|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » छायाचित्राच्या नादात दरीत कोसळला युवक

छायाचित्राच्या नादात दरीत कोसळला युवक 

छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये बुधवारी सकाळी एक युवक छायाचित्र काढण्याच्या प्रयत्नात बम्लेश्वरी टेकडीवरून कोसळला. पण खाली जंगल असल्याने युवक झाडात अडकला. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने धाव घेत युवकाला वाचविले. युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यातआले.