|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सायना नेहवालचा व्हिसा ‘लाल फितीत’

सायना नेहवालचा व्हिसा ‘लाल फितीत’ 

डेन्मार्क ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी अखेर परराष्ट्र मंत्र्यांना केले ट्विट

वृत्तसंस्था/ हैदराबाद

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱया डेन्मार्क ओपन स्पर्धेकरिता व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याची नाराजी व्यक्त केली होती. मंगळवारपासून स्पर्धेला सुरुवात होत असून सायनाला अद्याप व्हिसा मिळालेला नाही.

सायनाने आपल्याला व्हिसा मिळवण्यात अडचण येत असून याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मदत करावी, अशा आशयाचे ट्विट परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना केले होते. यानंतर जयशंकर यांनी पुढील आदेश दिल्यानंतर सायनाच्या व्हिसाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘शुक्रवारी मी डेन्मार्कला रवाना होणार असून त्याआधी मला व्हिसा मिळेल,’ असा विश्वास सायनाने व्यक्त केला आहे. डेन्मार्कचा व्हिसा मिळण्यासाठी सायनाला विलंब लागला. पण, परराष्ट्र मंत्रालयला पुढील सुचना देण्यात आल्या असून दोन दिवसात सायनाला व्हिसा मिळेल, असे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विट केले आहे. सायनासोबत भारताची दिग्गज खेळाडू पीव्ही सिंधूही या स्पर्धेत सहभागी होत आहे.

डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान रंगणार आहे. गेल्या वषी सायनाला अंतिम फेरीत चीनच्या ताय झू यि’ग हिच्याकडून पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.