|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रक्तदान शिबिराने नवरात्रोत्सवाची सांगता

रक्तदान शिबिराने नवरात्रोत्सवाची सांगता 

व्हाईट आर्मी, हक्कदार श्रीपुजक मंडळातर्फे आयोजन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  अंबाबाई मंदिर दक्षिण दरवाजाजवळील मेडिकल कँम्पमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करुन शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. व्हाईट आर्मी आणि हक्कदार श्रीपुजक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारी हिच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरामध्ये 175 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. रक्त संकलन अर्पण, वैभवलक्ष्मी, संजीवनी आणि सीपीआर ब्लड बँकेच्या कर्मचाऱयांनी केले. यावेळी व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे आणि हक्कदार श्रीपुजक मंडळाचे माधव मुनीश्वर प्रमुख उपस्थित होते.