|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कृषी कन्यांचे जनजागृती कार्य गौरवास्पद : डॉ. खोत

कृषी कन्यांचे जनजागृती कार्य गौरवास्पद : डॉ. खोत 

वार्ताहर/ माजगाव

कृषी कन्या शेतकरी वर्गाच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करुन जनजागृती करीत आहेत. त्यांचे कार्य हे गौरवास्पद आहे. असे प्रतिपादन सहयोगी अधि÷ाता राजषी शाहू महाविद्यालय, कोल्हापूरं यांनी केले आहे.

केर्ले (ता. करवीर) येथे राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय, कृषी विभाग महाराष्ट्र शासन तसेच विविध कंपन्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बंडा कुंभार तंत्र अधिकारी गुणनिमंत्रक कोल्हापूर हे होते.

सकाळच्या सत्रात विविध कृषी कंपन्या यांचेवतीने रांगोळी पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. कृषी कन्या स्वप्नाली खाडे हिने वर्ज केमिकलच्यावतीने प्रत्यक्ष कीट घालून औषध फवारणी व योग्य दक्षता घेणेचे आवाहन केले. कृषी कन्या मानसी कुंभार हिने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राचे चेअरमन डॉ. आर. आर. हासुरे यांनी एकरी 100 टन उसाचे उत्पादन कसे घ्यावे, यावर मार्गदर्शन केले.

कृषी संचालिका भाग्यश्री पवार यांनी शेतीपुढील आव्हाने, महिला सशक्तीकरण यावर मार्गदर्शन केले. डॉ. महेंद्र यादव यांनी शास्त्रशुद्ध शेती व पशुपालन यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी सी. व्ही. गेंगाणे, केर्ले गावच्या सरपंच उषाताई माने, प्रियांका भिसे, प्राजक्ता पाटील, वैशाली अस्वले उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजाता टिळेकर यांनी तर सायली चव्हाण यांनी आभार मानले.