|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आई रागावल्याने तरूणीची आत्महत्या

आई रागावल्याने तरूणीची आत्महत्या 

वार्ताहर/ राजापूर

किरकोळ कारणावरून आई रागावल्याने 21 वर्षीय तरुणीने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील रायपाटण-टक्केवाडी येथे घडली. यातील मृत तरूणीचे नाव सायली संजय शेटे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.    

 या बाबत राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटे कुटुंबाकडे असलेल्या पाळीव कुत्र्यावर जंगली प्राण्याने हल्ला करून त्याला जखमी केले होते. त्यामुळे कुत्र्याला घरातच ठेवण्यावरून सायली हिच्यावर तिची आई रागावली होती. त्यामुळे सायली हिने मंगळवारी रात्री 9.45 ते 10 या वेळेत घरातील बाथरुमच्या दरवाजाजवळ साडीने गळफास लावून घेतला आणि आपले जीवन संपवले. हा प्रकार घरच्यांचा नंतर लक्षात आला. त्या दरम्यान सायली ही बेशुध्द होती. यावेळी अधिक उपचारासाठी तिला रायपाटण ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता तिची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन जाधव करीत आहेत.