|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कवठेएकंद येथे बारा तास नेत्रदिपक आतषबाजी

कवठेएकंद येथे बारा तास नेत्रदिपक आतषबाजी 

2019 चा महापूर-चांद्रयान-2 यशस्वी उड्डाण,  ठरले खास आकर्षण

प्रतिनिधी/ तासगाव

तासगांव तालुक्यातील कवठेएकंद येथे मंगळवारी दसऱयादिवशी नियमावलीच्या चौकटीत राहून श्री बिऱहाड सिध्दराज महाराजांच्या पालखी पुढे सुमारे 12 तास शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली.आकाश उजळून टाणाऱया सप्तरंगी,    नेत्रदिपक,नयनरम्य,आतषबाजीने हजारो लोकांच्या डोळयाचे पारणे फिटले.यावर्षी 2019चा महापूर,चांद्रयान-2 चे यशस्वी उड्डाण,उगवता सुर्य,हे देखावे खास आकर्षण ठरले.      श्री बिऱहाडसिध्द देवस्थान हे प्रमुख कपिल महामुनींचे वस्तीस्थान असून 18 व्या शतकापासून पालखी समोर शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात येत आहे.  आज ही ती परंपरा अखंड सुरू आहे.बिऱहाडसिध्द महाराज हे बहिणीला भेटण्यासाठी देवघरे येथे जाण्यास निघतात औंऊटांच्या सलामीने मंगळवारी रात्री  9 च्या दरम्यान पालखीला सुरवात झाली.

     बसस्थानकाजवळील बिरोबा व नागोबा मंदिर येथे सोने लुटल्यानंतर पालखीला प्रारंभ झाला.पालखी समोर देवाचा अश्व होता.श्री बिरोबा देवाची ही पालखी होती.पालखी पुढे जात असतानाच गावातील सुमारे 200 मंडळानी रस्त्याच्या दुतर्फा तयार केलेल्या शोभेच्या दारूकामाची आतषबाजी करण्यात येत होती.

     यामध्ये रंगी-बेरंगी झाडे,डिस्को झाडे,लाकडी शिंगटे,चक्रामध्ये पंचमुखी चक्र,   बुरूज चक्र,फुगडी,नयन चक्र,दांडपट्टा,धबधबा,मोर,यासह विविध रंगातील औट,आदी ऍटमचा समावेश होता.या सर्वच ऍटमनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.ऍटम यशस्वी रित्या उडताच तरूण कार्यकर्ते हर-हर च्या जयघोषात नाचून आनंद व्यक्त करीत होते.

     ही नेत्रदिपक आतषबाजी पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा घराच्या छतावर लोकांची मोठी गर्दी होती.यावेळेचे खास आकर्षण 2019 चा महापूर हा देखावा होता.यावेळी या महापूरात,पूरग्रस्तांना पोलीस,एन डी आर एफ,आर्मी या पथकांसह नागरिकांनी महापूरातून सुखरूप कसे बाहेर काढले,याचे प्रात्यक्षिक आतषबाजीतून,   पावसासह डिजीटल पोस्टर मधून दाखवण्यात आले.हे पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.तर ऍटम यशस्वी होताच कार्यकर्त्यांनी नाजून आनंद व्यक्त केला.हे खास आकर्षण तोडकर बंधूच्या नयनदिप दारूशोभा मंडळाच्या वतीने बनवण्यात आले होते.तसेच बोरकर बंधूच्या श्रीराम फायर वर्क्सच्या वतीने व माळी बंधूंच्या वतीने व इकबाल नदाफ यांच्या कल्पकतेतून स्वतंत्रपणे दोन ठिकाणी चांदयान-2 यशस्वी उड्डाण हे देखावे शोभेच्या दारूकामातून साकारले होते.तर ए-वन दारू शोभा मंडळाच्या वतीने ही चांद्रयान-2यशस्वी उड्डाण हा देखावा आतषबाजीतून पाहवयास मिळाला.यासह इतर मंडळानी नेत्रदिपक ऍटमचे आतषबाजीतून       प्रात्यक्षिक करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

     हिंदमाता क्रीडा मंडळ यांच्या वतीने झुंबर,औट,पांढरे झाड काम,घागर औट,यासह इतर नेत्रदिपक दारूकामचे प्रात्यक्षिक करण्यात आले.सिध्दराज फायर वर्क्सच्या वतीने देशमाने बंधूनी आर्कषक झाडकाम तसेच औट यांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची वाहवा मिळवली.महावीर दारू शोभा मंडळ,सिध्दी विनायक मंडळ,अजिंक्यतारा मित्र मंडळ,सत्वशील दारूशोभा मंडळ,यांचे वतीने ही सातत्य ठेवत आकर्षक आतषबाजी करण्यात आली.गावातीलच त्रिमुर्ती,नवतरूण,नवतरंग,    अहिंसा,हिंदु-मुस्लिम,लकी,आकाशदिप,नवहिंद,गोल्डन,श्री सिध्दराज,उत्कर्ष,महावीर,   हिंदमाता,हर-हर,शिव छत्रपती,यासह इतर मंडळाकडून नेत्रदिपक आतषबाजीचे    याप्रसंगी करण्यात आले.                                    

     यावर्षीही बाण न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.याचे स्वागत होत होते.तर अनेक धोकादायक ऍटम वगळण्यात आले होते.असे असले तरी आकाशात उडणारे विविध रंगाचे औट पाहून लोक थक्क होत होते.मंगळवारी रात्री  पासून सुरू झालेली ही आतषबाजी बुधवारी सकाळ पर्यंत सुरू होती.सुमारे दिड    कि.मी.प्रवास करून देवघर येथे ही पालखी सकाळी 9 च्या दरम्यान पोहचली.

      लाकडी शिंगटे विभागणीमुळे सोयीचे झाले.

     मागील वर्षी प्रमाणे एकाच ठिकाणी लाकडी शिंगटे असे न करता या वर्षी लाकडी शिंगटे मंदिर परिसरात व अन्य एका  ठिकाणी उडवण्याची सोय करण्यात आली होती.या विभागणीमुळे सोयीचे तर झालेच पण मंदिर परिसरात अधिकची गर्दी न होता पालखी लवकर पुढे सरकण्यास मदत झाली.व सर्व ऍटम व्यवस्थित पाहता आले.                                                                 

     खासदार संजय काका पाटील,आमदार सुमनताई पाटील,अप्पर जिल्हाधिकारी गोपींचद कदम तहसिलदार कल्पना ढवळे,मा.मंत्री अजितराव घोरपडे,रोहितदादा पाटील,जि.म.बँकेचे संचालक डॉ.प्रताप नाना पाटील,यांनी कवठेएकंद येथे भेट देऊन ग्रामस्थांची विचारपूस करून दारूकामाबाबत माहिती घेतली.तसेच हे नेत्रदिपक काम पाहण्यासाठी तासगांव तालुक्यासह जिल्हयातूनव जिल्हयाबाहेरून मोठी गर्दी झाली होती.तर रविंद्र कुलकर्णी,मनोज पाटील,विजय माने,दिपक गुरव,विशाल चंदूरकर,जयंवत माळी,रामचंद्र थोरात,किसन जाधव,आनंदराव काळे,बजरंग गुरव,ट्रस्टची सदस्य,मंडळाचे गोलंदाज यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,मानकरी,पुजारी यांनी यावेळी नेटके नियोजन केले होते.

     गावात अनेक ठिकाणी भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.तर भेळचे,चहाचे,गाडे,खादय़ पदार्थ स्टॉल ही उभे करण्यात आले होते.इमारतींना आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आली होती.उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर,यांचे नेतृत्वाखाली व पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मराठा समाजाचे वतीने जि.प.शाळेत प्रथमोपचार केंद्र सुरू होते.तर तासगांव नगरपरिषदेच्या वतीने अग्निशमन गाडीची सोय करण्यात आली होती.

     क्षणचित्रे.

.उत्सवाच्या अगोदर दोन दिवस पावसनो उघडीप दिल्याने ग्रामस्थांना ऍटम तयार सोयीचे झाले.तसेच पालखीला सुरवात झालेपासून शेवटपर्यंत पावसाने उघडीप दिली यामुळे मोठी गर्दी पाहवयास मिळाली.

.पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे पालखीला सुरवात झालेपासून रात्रभर पालखी बरोबर थांबून होते.

.किरकोळ जखमीना तातडीने ऍम्ब्युलन्स मधून उपचारासाठी नेता यावे यासाठी ऍम्ब्युलन्स सज्ज होत्या.

.उडवण्यात येणाऱया ऍटम बाबत तसेच दक्षतेबाबत सतत माईक वरून माहिती दिली जात होती.

Related posts: