|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राजधानीत शाही दसरा उत्साहात

राजधानीत शाही दसरा उत्साहात 

प्रतिनिधी/ सातारा

मराठय़ाची राजधानी साताऱयात दरवर्षीप्रमाणे शाही दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. जलमंदिर निवासस्थानी भवानी तलवारीचे पुजन पुरोहितांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते विधिवत पद्धतीने करण्यात आले. जय भवानी जय शिवाजीच्या गजरात भवानी तलवारीची मिरवणूक सजवलेल्या पालखीतून जलमंदिरपासून काढण्यात आली. सायंकाळी या मिरवणुकीला पाहण्यासाठी साताकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. शिवतीर्थावर उदयनराजेंनी दसऱयाचे शस्त्रपूजन करुन सिम्मोल्लघंन केले.

दरवर्षीप्रमाणे साताऱयात शाही दरवर्षीप्रमाणे उत्साही आणि शाही पद्धतीने साजरा करण्यात आला. सायंकाळी साताऱयात कमालीचा उत्साह निर्माण झाला होता. जलमंदिर पॅलेसवर भवानी तलवारीचे पूजन पुरोहितांच्या हस्ते करण्यात आले. भवानी मंदिरात आरती झाल्यानंतर पुढे सजवलेल्या पालखीत ती तलवार ठेवून बाहेर काढण्यात आली. ही मिरवणूक पुढे राजवाडा, मोती चौक, देवी चौकातून पुढे पोलीस मुख्यालय मार्गे शिवतीर्थावर ही मिरवणूक पोहचली. मिरवणूक पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. शिवतीर्थावर भवानी तलवार पोहचल्यानंतर जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला. एकच महाराज उदयनमहाराज अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उदयनराजेंच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.

Related posts: