|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात स्वातंत्र्य टपाल विभागाची मागणी करणार

गोव्यात स्वातंत्र्य टपाल विभागाची मागणी करणार 

मुख्यंमत्री डॉ. सावंत यांचे टपाल खात्याच्या कार्यक्रमात आश्वासन

प्रतिनिधी/ पणजी

 गोवा राज्यासाठी स्वतंत्र्य टपाल विभाग असावा यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. केंदीय मंत्री रविशंकर यांच्याशी यासंर्भात चर्चा झाली आहे. यात पाठपुरावा करुन स्वतंत्र्य टपाल विभाग तयार केला जाणार आहे. स्वातंत्र्य टपाल तयर झाल्यावर गोमंतकीय युवकांना येथे नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्राद सावंत यांनी सागितले. टापाल विभागाने पणजीत आयोजित केलेल्या जागतिक टपाल दिन आणि राष्ट्रीय टपाल सत्पाहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले.

 यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक पोस्टर मास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार, टपाल अधीक्षक कोरगप्पा यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते या प्रसेंगी टपाल खत्याचे कर्मचारी प्रसन्ना परब यांच्या छायाचित्रावर आधारित ऑर्किड फुलांवरील टपाल तिकीटांचे प्रदर्शन करण्यात आले.

पर्रीकरांच्या आयुष्यावर टपाल टिकीट करावे

यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री व केंदीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित टपाल टिकीटांचे प्रकाशन करण्याची मागणी केली. पर्रीकर हे गोव्यात नव्हे जगभर प्रसिद्ध राजकीय व्यक्ती होती. त्याची माहिती सर्व समान्य मिळावी व्यासाठी हा उपक्रम टपाल खात्याने करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

टपाल खात्याचे काम उल्लेखनीय

 टपाल विभागाचे काम खूप उल्लेखनीय असते. जगात सर्वात विश्वासू माणूस पोस्टमॅन आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पत्र, मनीऑर्डर पोहचविण्याचे काम पोस्टमॅन करतो. आता टपाल खात्याचे स्वरुप बदलले आहे. बॅर्कीग, पासपोर्ट सेवा ही काम  पोस्टकडून केली जातात. मात्र सामाजिक सुरक्षा योजना ताळागाळापर्यत पोहचविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. याकामी टपाल खात्याची मोठी मदत होऊ शकते. यातून अंत्योदय ही संकल्पना साकार होऊ शकते. यासाठी  टपाल खात्याने निर्धारित वेळेत उद्दीष्ट साध्य करावीत. यासाठी सर्वत्र टपाल विभाग असणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टपाल खाते समाजला जोडतेः आयुष मंत्री

 टपाल खाते हे समाजासोबत जोडलेले आहे. गावामध्ये पोस्टमनची आतुरतेने वाट पाहिली जाते. पोस्टने जोपलेला हा विश्वास आहे, असे यावेळी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सागितले. देश आणि समाजाच्या विकासात टपालचा मोठा वाटा आहे. लोकांना जोडण्याचे काम टपाल खात्याने केल आहे. दिवसेदिवस टपाल खत्याचा दर्जा सुधारत आहे, असेही मंत्री नाईक यांनी सागितले. टपाल खात्याला राज्य आणी केंद सरकारकडून वेळोवळी मदत होत असते. त्ंयांनी आणखीन सुधारणा करावी असे त्यांनी सुचविले. यावेळी टपाल खात्याचा उत्कृष्ट कार्मचाऱयांचा गौरव करण्यात आला. तसेच टपाल खात्याच्या सुलभ वाहतुकीसाठी दोन वाहनांचा शुभारंभ करण्यात आला.

 यावेळी पोस्टमास्तर जनरल डॉ. एन विनोदकुमार यांनी टपाल खात्याने अवलंबीलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ‘सुकन्या समृद्धी’ योजनेच्या प्रसिद्ध आणि प्रचारासाठी स्वातंत्र्य पथक शाळा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उत्कृष्ट कार्य करत असल्याचे डॉ. विनोद कुमार यांनी सांगितले.