|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कार डिलर असोसिएशनकडून सरकारचे आभार

कार डिलर असोसिएशनकडून सरकारचे आभार 

प्रतिनिधी/ पणजी

 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्या पुढाकाराने आज वाहतूक खरेदी क्षेत्रात वाढ झाली असून रस्ता कर 50 टक्के कमी करण्यात आल्याने आम्ही सरकारचे आभार मानतो, असे ऑल गोवा कार डिलर असोसिएशनशेचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

 गेल्या काही वर्षात कार खरेदी 30 ते 40 टक्के कमी झाली होती. तसेच दुचाकीची खरेदी घटली होती. व्यवसायिक चिंतेत होते. रस्ता करचा वाढता फटक्यामुळे ग्राहकांनी वाहनांची खरेदी कमी केली. काही दिवसापूर्वी गोव्यात झालेल्या जीएसटी बैठकीत आम्ही आमचा प्रस्ताव वाहतूक मंत्री तसेच मुख्यमंत्री मार्फत सांगितले. वाहतूक  मंत्र्यांनी पुढाकार घेऊन ही निविदा मांडली त्यांच्या पुढाकारामुळे आज रस्ता करात 50 टक्क्यांनी कमी झाली आहे त्यामुळे 30 डिसेंबरपर्यत गाडय़ांची नोंदणी सुरु झाली आहे. अनेक दिवसांपासून आमची ही मागणी होती. सरकारने पूर्ण केल्याने आम्ही  सरकारचे आभारी आहोत, असे जाशी यांनी सांगितले. कार खरेदी व्रिकी व्यवसायाला जीएसटीचा काहीच परिणाम झाला नाही जीएसटीचा लोकांना फटका बसत नव्हता तर रस्ता कर मोटय़ प्रमाणात होता. वाहतूक मंत्र्यांनी यात बदल केल्याने आता याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना झाला आहे, असे जोशी म्हणाले.

 मागिल काही वर्षात दुचाकी खरेदी संख्याही घटली होती.. पण या निर्णयामुळे आता पुन्हा संख्या वाढली आहे. अनेक लोकांनी दुचाक्या खरेदी केल्या आहेत नावनोंदणी rकेली आहे,  असे यावेळी वल्लभ कुकळेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत या असोसिएशनचे परिंद नास्नोडकर उपस्थित होते.