|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भरधाव वाहनाच्या धडकेत महिला ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत महिला ठार 

प्रतिनिधी/  संकेश्वर

भरधाव वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणारी महिला जागीच ठार झाली. हा अपघात मंगळवारी सायंकाळी 7 वाजता कणगलेनजीक राष्ट्रीय महामार्गावर घडला. वैजयंता बाळासाहेब कोरे (वय 54 रा. कणगले) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 मृत वैजयंता या कणगला गावातील दसरा सणानिमित्त काढण्यात येणाऱया रथोत्सवासाठी आल्या होत्या. त्यांचे घर महामार्गापलीकडे असल्याने हा सोहळा आटोपून पुन्हा आपल्या घरी जात होत्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग ओलांडतेवेळी कोल्हापूरकडून बेळगावकडे जाणाऱया भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक देऊन, सुमारे 8 फूटापर्यंत फरफटत नेले. यात त्या जागीच ठार झाल्या. घटनास्थळी वाहनाची तुटलेली नंबरप्लेट आढळली असून, त्यावर एमएच-एफझेड 5197 असा अर्धवट क्रमांक आहे. त्यामुळे ते कोणते वाहन आहे, याचा सुगावा अद्यापही लागलेला नाही. या अपघाताची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली आहे.