|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » परतीच्या पावसाने तालुक्मयात हाहाकार

परतीच्या पावसाने तालुक्मयात हाहाकार 

जनजीवन विस्कळीत : अनेक रस्त्यांवर पाणी, पिकांचे मोठे नुकसान

वार्ताहर/ किणये

तालुक्मयात बुधवारी परतीच्या पावसाने हाहाकार माजविला. मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून शिवारात पाणी वाढले आहे. यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱया मुसळधार पावसामुळे बळिराजा संकटात सापडला आहे. यंदा तालुक्मयात ओला दुष्काळ होणार असे शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. दीड महिन्यापूर्वी महापूर व आता परतीचा पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

बटाटा, रताळी काढणी ठप्प

मंगळवारी तालुक्मयाच्या काही भागात पाऊस झाला. तर बुधवारी पावसाने सर्रास भागाला झोडपून काढले. पावसामुळे बटाटा, भुईमूग, सोयाबीन, रताळी काढणी ठप्प झाली आहे.

दीड महिन्याभरापूर्वी आलेल्या महापुरामुळे अनेक पिके पाण्याखाली जाऊन कुजून गेली. नदी-नाल्यांचे पाणी थेट शिवारात येऊन बांध फुटण्याचे प्रकारही मोठय़ा प्रमाणात घडले. या महापुरात शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक गावांचे संपर्क रस्ते पाण्याखाली गेले. पंधरा-वीस दिवस पावसाने उघडिप दिली. यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला होता. पण गेल्या आठवडय़ापासून पुन्हा मान्सूनची भीती शेतकऱयांसह सर्वसामान्य लोकांना लागून राहिली आहे.

महापुरात भात, बटाटा, ऊस, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले. काही शिवारात असलेल्या पिकांवर शेतकऱयांची आस लागून होती. मात्र पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱयांची झोप उडविली आहे.

बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी एकनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडतच होता. बुधवारी झालेल्या पावसाने रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणी आले. यामुळे परत महापुराचा सामना करावा लागणार की काय, याची भीती सर्वांना लागली आहे.

महापुरात तालुक्मयातील पिकांचे 80 टक्के नुकसान झाले होते. उर्वरित पिकांवर बळिराजा उपजिवीका करण्यासाठी धडपडत होता. पण परतीच्या पावसाने शेतकऱयांचे जगणे मुश्कील बनले आहे.

Related posts: