|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राजहंसगडावर दसरा उत्साहात साजरा

राजहंसगडावर दसरा उत्साहात साजरा 

प्रतिनिधी/ बेळगाव

पारंपरिक पद्धतीने यावषीही राजहंसगडावर दसरा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. येथील सिद्धेश्वर मंदिरमध्ये विधीवत पूजाअर्चा व आरती करण्यात आली.

राजहंसगड, नंदिहळ्ळी, देसूर, गर्लगुंजी, येळ्ळूर, सुळगे (ये.) आदी भागातून भाविक मोठय़ा संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते. सिद्धेश्वर मंदिरमध्ये पालखीची पूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी गडावरून पालखीची वाजतगाजत मिरवणूक काढत गावामध्ये पालखी सोहळा पार पाडला.

गाव पंचकमिटीच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी सोनं लुटण्याचा कार्यक्रमही झाला.

पावसाची संततधार सुरूच

मंगळवारी दुपारी तीनपासून वादळी वारा व विजांच्या कडकडाटाने पावसाला सुरुवात झाली. बाहेरगावाहून येणाऱया भाविकांचा यावेळी खोळंबा झाला. या परिसरात पावसाची संततधार सुरूच  असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

माजी ता. पं. सदस्य सिद्धाप्पा छत्रे, शंकर पवार, धाकलू इंगळे, सिप्पय्या बुर्लकट्टी, हणमंत नावगेकर, भाऊराव पवार, जयराम कुंडेकर, सिद्दाप्पा खांबले, कृष्णा पवार, रोहित इंगळे, धाकलू बिर्जे, सदानंद हावळ, राजू हावळ, सिद्दाप्पा मोरे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.