|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चैतन्यदायी दौडची जल्लोषात सांगता

चैतन्यदायी दौडची जल्लोषात सांगता 

बेळगाव  / प्रतिनिधी  

घटस्थापनेपासून सुरू झालेल्या बेळगावच्या ऐतिहासिक दौडची मंगळवारी दसऱयादिवशी सांगता झाली. शेवटच्या दिवशी दौडने गर्दीचा उच्चांक गाठला होता. 30 हजारांहून अधिक शिवभक्त या दौडमध्ये सहभागी झाल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरात सर्वत्र भगवे फेटेधारी युवकांचे चित्र दिसून येत होते. या दहा दिवसांमधून मिळणारी ऊर्जा घेऊन धारकरी आता वर्षभर देव, देश धर्मासाठी कार्यरत राहणार आहेत…

  दहाव्या दिवशीच्या दौडला मारूती गल्ली येथील मारूती मंदिरापासून प्रारंभ झाला. शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणामंत्राने दौडला सुरूवात झाली. बसवाण गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, गवळी गल्ली, गेंधळी गल्ली या प्रमुख गल्ल्यांमध्ये दौडचे उत्साहात व फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून धारकऱयांचे स्वागत केले.

आकर्षक फुलांची आरास व फुग्यांची सजावट असे मन प्रसन्न करणारे वातावरण पसरले होते. धर्मवीर संभाजी चौकात दौडची सांगता झाली. शिवचरित्राचे अभ्यासक सौरभ करडे यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येयमंत्राने यावषीच्या दौडची सांगता झाली. आनंद चौगुले व विलास लाड यांनी ध्येयमंत्र उच्चारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले.

तरूणाईचा सत्कार

विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या तरुणांचा शिवप्रति÷ानतर्फे सत्कार करण्यात आला. मागील वषी मोहिमेवेळी झालेल्या शिवप्रभू दौडमध्ये प्रथम आलेल्या सचिन बाळेकुंद्री तसेच पहिल्या पाच मध्ये आलेला राजू तुळजाई यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर जागतिक विश्वविक्रम करणाऱया भरत कल्लाप्पा पाटील याचाही शिवचरित्राचे अभ्यासक सौरभ करडे व शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सुवर्णसिंहासनासाठी कर्तव्यनिधी 

स्वराज्याची राजधानी असणाऱया रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन उभारण्याचा संकल्प शिवप्रति÷ानने केला आहे. त्यासाठी बेळगावमधून कर्तव्यनिधी देण्यात येत आहे. सुमन फौंडेशनचे अध्यक्ष अनिल कुकडोळकर यांनी 51 हजार रूपयांचा धनादेश शिवप्रति÷ानच्या पदाधिकाऱयांकडे सोपविला. त्याचबरोबर पप्पू मजुकर यांनी 10 हजार, सोमनाथ मेणसे 5 हजार, रोहन निळकंठाचे 5 हजार, कुणाल दरवंदर यांनी 5 हजार रूपयांचा धनादेश दिला. 

रोहित सुखकारे

मागील वषीपासून दौडमध्ये मी सहभागी होत आहे. मला फोटोग्राफीची आवड असल्याने मी माझ्या कलेच्या माध्यमातून या दौडची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथील शिस्त, तरूणाईचा असणारा उत्साह इतरांपर्यंत फोटोच्या माध्यमातून पोहोचावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे रोहित याने सांगितले.

 

Related posts: