|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नृत्याचे धडे नकोत दौडीतून बोध घ्या

नृत्याचे धडे नकोत दौडीतून बोध घ्या 

शिवचरित्राचे अभ्यासक सौरभ करडे यांचे प्रतिपादन

बेळगाव

आजच्या तरुणाईने देव, देश आणि धर्मासाठी त्याग करण्याचे ध्येय बाळगणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून तरुण वर्ग टिपरी नृत्यामध्ये रमतो आहे. महिषासूर मर्दिनीने नवरात्रीत राक्षसाचा वध करून शौर्य दाखवून दिले होते. या शौर्याचे प्रतिक असणाऱया शिस्तीचे धडे देणाऱया प्रेरणादायी दौडमधून बोध घ्या असे प्रभावी मार्गदर्शन पुणे येथील शिवचरित्राचे अभ्यासक सौरभ करडे यांनी केले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौडच्या सांगता समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, शहर प्रमुख अजित जाधव, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख कल्लाप्पा पाटील, तालुका कार्यवाहक परशराम कोकीतकर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, मुघलांनी मंदिरे मोडली, आया बहिणींची अब्रू लुटली त्यावेळी सहय़ाद्रीतून एक मावळा पुढे आला आणि त्याने स्वराज्याचे स्वप्न पाहिले. मोजक्मया मावळय़ांना हाताशी घेऊन शिवबांनी अनेकांच्या नाकी दम आणला. अटक पासून कटकपर्यंत आपले साम्राज्य वाढविले. शिवरायांचे राज्य आले आणि महिलांवरील अत्याचार थांबले. त्यामुळेच 350 वर्षानंतरही छत्रपतींची किमया संपूर्ण हिंदुस्थानावर आहे असे त्यांनी सांगितले.

 बलिदानाची नाही तर योगदानाची गरज

त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळय़ांनी बलिदान देऊन स्वराज्याची स्थापना केली. परंतु मुघलांनी त्यानंतरच्या काळात स्वराज्याचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. आता भिडे गुरूजींनी केलेल्या संकल्पाप्रमाणे रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन उभारण्याचे काम सुरू करून स्वराज्याच्या राजधानीला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात बलिदानाचे नाही तर योगदानाची गरज आहे, असे सौरभ यांनी सांगितले. 

तरूण भारतमुळे दौड सर्वत्र पसरली

बेळगावच्या दैनिक तरूण भारतने आपल्या वृत्रपत्र व सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिलेल्या प्रसिद्धीमुळे आम्ही पुण्यात या दौडचे व्यापक रूप पाहत होतो. त्यामुळे या दौडमध्ये कधी सहभागी होता येईल, असा प्रश्न मनामध्ये यायचा, आज अखेर हा योग जूळून आला. त्यामुळे मी तरूण भारतचे आभार मानतो की, त्यांनी दौड महाराष्ट्रापर्यंत पोहोचविली. असे कौतुकोद्गार सौरभ करडे यांनी काढले.

Related posts: