|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » अमित शहा, योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात

अमित शहा, योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

प्रचारसभांचा धडाका तर सर्व पक्षांच्या नेत्यांचा सुरू आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात आहेत. दोघांच्याही दिवसभर सभा असणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील राज्यभर फिरत असून त्यांची नागपूर जिह्यात सभा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वाकडून शरद पवार यांना लक्ष केलं जात आहे. त्यामुळे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आज जाहीर सभांमधून कलगीतुरा रंगण्याची शक्मयता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज मुंबईत दोन सभा होत आहेत. सांताक्रूझ आणि गोरेगाव इथं राज ठाकरेंच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे हे आज सकाळी कसबा गणपतीची आरती केल्यानंतर सभेसाठी रवाना होतील. बुधवारी पुण्यातील राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा पावसामुळं रद्द करण्यात आली होती. जोरदार पाऊस झाल्यामुळं सभेच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळं अखेर ही सभा रद्द करावी लागली.

अमित शाह यांच्या आज जत, अक्कलकोट, तुळजापूर आणि औसामध्ये सभा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोलापुरातल्या मंगळवेढा, नातेपुते, साताऱ्यातल्या म्हसवड, फलटणमध्ये सभा रंगणार आहे. पुण्याच्या भोसरीमध्ये तसंच पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आज मराठवाडय़ाच्या दौऱयावर आहेत. जालन्यातील घनसावंगी, औरंगाबादेतील वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद शहरामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा होणार आहेत.