|Friday, October 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार! 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱया ‘रिलायन्स जिओ’ ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे.

रिलायन्स जिओ मोबाईलवरून इतर मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना केलेल्या कॉल्ससाठी आता 6 पैसे मोजावे लागणार आहे. ट्रायनं आययूसी हा चार्ज पुन्हा सुरू केल्यानं जिओला नाईलाजानं 6 पैसे प्रति मिनिट दरानं चार्ज करावं लागतं आहे. जेव्हा एका मोबाईल कंपनीचा ग्राहक दुसऱया मोबाईल कंपनीच्या ग्राहकाला फोन करतो, तेव्हा फोन करणाऱयाच्या मोबाईल कंपनीला चार्ज द्यावा लागतो. 2017 पासून हा चार्ज ट्रायनं बंद केला होता. पण आता अचानक ट्रायनं हा चार्ज पुन्हा सुरू केला आहे. 1 जानेवारी 2020 पर्यंत तरी हा चार्ज सुरू राहणार आहे.

मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.