|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » क्षुल्लक कारणावरून दलित युवकावर विळीने वार

क्षुल्लक कारणावरून दलित युवकावर विळीने वार 

ऑनलाइन टीम / तामिळनाडू

तामिळनाडूतील एका गावात क्षुल्लक कारणावरून दलित युवकावर विळीने हल्ला करण्यात आला. थेनी जिह्यातील कोडंगीपट्टी गावात सोमवारी ही घटना घडली. घरासमोर पायावर पाय ठेवून बसल्याच्या रागातून शेजाऱयाने त्याच्यावर विळीने वार केले. यात दलित युवक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

23 वषीय सुंदर हा मोबाइल घेऊन घरासमोर बसला होता. यावेळी आरोपी किन्नन हा त्याच्याजवळ आला. सुंदर पायावर पाय ठेवून पसरून बसल्याने आरोपीला राग आला. त्याने सुंदरला शीवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर घारातून विळी आणून आपल्या मुलाच्या मदतीने आरोपीने सुंदरवर वार केले.

आरोपी किन्नन आणि त्याच्या मुलाने सुंदरच्या मांडीवर आणि पार्श्वभागावर विळीने वार केले. यात सुंदर जखमी झाला. थेनीमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, सुंदरचे वडील सेल्वाराज यांनी या प्रकरणी पलनीचेट्टीपट्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी आरोपी किन्नन आणि त्याच्या मुलाविरोधत ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. घटनेनंतर आरोपी पिता, पुत्र फरार झालेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.