|Friday, October 18, 2019
You are here: Home » क्रिडा » बॉक्सिंग : मेरी कोम उपांत्य फेरीत

बॉक्सिंग : मेरी कोम उपांत्य फेरीत 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

विश्वविजेतेपदावर सहा वेळा मोहोर नोंदविणाऱया एम.सी.मेरी कोमने गुरुवारी जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. 51 किलो वजनी गटात मेरी कोमने भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे.

मेरी कोमने कोलंबियाच्या इंगोट वालेंसियाला 5-0 ने मात केली. या कामगिरीसह मेरी कोम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी मेरी कोमने 48 किलो वजनी गटात सहा सुवर्णपदके आणि सहा रौप्यपदके जिंकली आहेत.

मात्र, मेरी कोम यंदा पहिल्यांदाच 51 किलो वजनी गटातून खेळत आहे.