|Saturday, January 25, 2020
You are here: Home » leadingnews » नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र पुन्हा प्रगतीपथावर

नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र पुन्हा प्रगतीपथावर 

ऑनलाइन टीम / सांगली  : 

केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करू लागल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले. ते गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जत येथील सभेत बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कारभारावर टीका करताना गेल्या पाच वर्षांतील फडणवीस सरकारचे काम कसे उजवे आहे, हे अधोरेखित करण्याच प्रयत्न केला.

ते म्हणाले आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून राज्याला 1,15,500 कोटी रूपयांची मदत मिळाली. मात्र, मोदी सरकारच्या काळात ही मदत अडीचपटींनी वाढून 2,86,354 कोटीवर पोहोचली आहे. ‘नरेंद्र-देवेंद्र’ या डबल इंजिनामुळे महाराष्ट्र देशात पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

फडणवीसांचे कौतुक करताना ते म्हणाले, फडणवीसांसारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही जो दिवसरात्र जनतेसाठी काम करीत आहे. रात्रीच्या एक वाजता देखील कोणी त्यांच्याकडे गेल्यास ते त्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात.

 

Related posts: