|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » राज ठाकरे यांनी घेतले कसबा गणपतीचे दर्शन

राज ठाकरे यांनी घेतले कसबा गणपतीचे दर्शन 

पुणे / प्रतिनिधी : 

अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे पुण्यात बुधवारी होणारी पहिली प्रचारसभा ऐनवेळी रद्द करावी लागली. त्यानंतर गुरुवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या दर्शन घेतले. कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.

राज ठाकरे यांची गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दोन ठिकाणी सभा होणार आहे. त्याआधी राज ठाकरे यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांचे मंदिर परिसरात औक्षण करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंदिर परिसरात उपस्थित होते.

दरम्यान आपल्या ठाकरी शैलीत व्यक्त न झालेले राज ठाकरे आता निवडणुकीच्या प्रचारात कोणकोणते मुद्दे उपस्थित करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रात गाजल्या होत्या.

 

 

Related posts: