|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विरोधीपक्षनेतेपद मिळवण्यासाठी सुशिलकुमारांचा विलिनीकरणाचा सल्ला : मुख्यमंत्री

विरोधीपक्षनेतेपद मिळवण्यासाठी सुशिलकुमारांचा विलिनीकरणाचा सल्ला : मुख्यमंत्री 

मंगळवेढा / प्रतिनिधी :

शिवसेना-भाजपा युतीने केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्रामध्ये विरोधीपक्षच शिल्लक राहिला नाही. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही थकलो असून दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याचा दिलेला सल्ला योग्य आहे. सुशिलकुमार द्रष्टे नेते आहेत. विलिनीकरण झाले तरच विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसला मिळू शकते. ही बाब त्यांना माहीती आहे. म्हणूनच त्यांनी विलिनीकरणाचा सल्ला दिला, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिवसेना-भाजप-रयत क्रांती रिपाई महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते पाटील, आ. प्रशांत परिचारक, सुधाकरपंत परिचारक, शहाजीबापू पाटील, माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, उमेश परिचारक, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, पंढरपूरच्या नगराध्याक्षा साधना भोसले, चरणुकाका पाटील आदी उपस्थित होते.

 यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. माजीमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेला सल्ला हा विरोधीपक्षनेतेपद मिळवण्यासाठी उपयोगी असल्याने दोन्ही काँग्रेस एकत्र आले तरी इतक्या जागा येणार नाहीत त्यामुळे त्यांची विरोधीपक्ष मिळवण्यासाठी स्पर्धा होणार आहे. तसेच विरोधी पक्ष या निवडणुकीत जे आश्वासन पूर्ण करता येत नाही असे आश्वासन देत आहेत. यामध्ये विरोधकांनी प्रत्येक मतदारांला ताजमहाल बांधून देतो असे आश्वासन दिले नाही. यांचेच आपणास आश्चर्य असल्यांचेही ते म्हणाले.

सांगली, सातारा ,कोल्हापूर या भागातील पूरपरिस्थिती आणि समुद्राला जाणारे पाणी वळवून सोलापूर जिह्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला देण्याच्या दृष्टीने आमचे सरकार गंभीर असून यापुढे दुष्काळमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबवणार आहेत.

Related posts: