|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » दुसऱया तिमाहीत टीसीएसचा नफा 1.8 टक्क्यांनी वाढला

दुसऱया तिमाहीत टीसीएसचा नफा 1.8 टक्क्यांनी वाढला 

वृत्तसंस्था /मुंबई :

देशातील माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधीत सेवा देण्यात कार्यरत असणारी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) चालू आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीत निव्वळ नफा 1.8 टक्क्यांनी वाढून 8042 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. मागील वर्षातील याच तिमाहीत कंपनीने 7,901 कोटीचा नफा झाला होता. तिमाहीतील कामगिरीत कंपनीचे उत्पन्न 5.8 टक्क्यांनी वाढून 38,977 कोटीवर पोहोचल्याची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजारात दिलेली आहे. हीच कामगिरी गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीत 36,854 कोटी रुपयावर राहिली होती.

अन्य कंपन्यांची कामगिरी

टीसीएससोबत अन्य तंत्रज्ञाना क्षेत्रातील कंपन्यांचे तिमाहीचे आकडे सादर होत आहेत. या वेळी टीसीएसने संचालक मंडळात पाच रुपयाचा अंतरिम लाभांश आणि 1 रुपये समभागावर 40 रुपयाची प्रति इक्विटी समभाग देण्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी दिली आहे.

 

 

 

Related posts: