|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » अनिल अंबानींची मुले रिलायन्स इन्फ्रात दाखल

अनिल अंबानींची मुले रिलायन्स इन्फ्रात दाखल 

वृत्तसंस्था /मुंबई :

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अनिल अंबानी यांच्या अनमोल आणि अंशुल या दोन्ही मुलांना संचालक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. कंपनीच्या पुढील बैठक होईपर्यत दोघेही अतिरिक्त म्हणूनच कारभार सांभाळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तर कंपनीचे अध्यक्ष प्रवर्तक अनिल अंबानीच राहणार आहेत. 

अनमोल (वय 27) यांनी ब्रिटनमधील वॉरविक बिझनेस स्कूलमध्ये मॅनेजमेन्टचे शिक्षण घेतले आहे. अनिल अंबानी ग्रुपची दुसरी कंपनी रिलायन्स कॅपिटलचे ते कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत राहिले आहेत. अंशुल अंबानी (वय 24) चालू वर्षातील जानेवारीत एडीएजी ग्रुपसोबत जोडले आहेत. ते रिलायन्स इन्फ्राच्या सर्व कार्यात कार्यरत असतात. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या  स्टर्न स्कूलमधून बिझनेस मॅनेजमेन्टची पदवी घेतली आहे.

 

Related posts: