|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » उद्योग » रत्ने, आभूषणांची निर्यात 7 टक्क्यांनी घटली

रत्ने, आभूषणांची निर्यात 7 टक्क्यांनी घटली 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

देशातील रत्न आणि आभूषणांच्या होणाऱया निर्यातीत चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात  जवळपास 7 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. तर 12.4 अब्ज डॉलर इतकी निर्यात झाली आहे. मुख्य विकसित बाजारातील मागणीतील घटीमुळे रत्ने व आभूषणांच्या निर्यातीचा टक्का खाली आल्याची माहिती रत्न व आभूषण निर्यात संवर्धन परिषद (जीजेइपीसी) यांनी दिली आहे.

मागील वर्षात याच कालावधीत रत्न व आभूषणांची निर्यात 13.4 अब्ज डॉलर राहिली होती. जीजेइपीसीच्या माहितीनुसार देशातील एकूण निर्यात श्रमावर आधारीत 15 टक्के क्षेत्राचा सहभाग राहिला होता. चालू वर्षात सोन्याचे दागिने, कलरमधील रत्ने आणि चकाकी व पॉलिश केलेले हीरे यांची निर्यात  काही प्रमाणात कमी झाली असल्याची नोंद केली आहे.

अन्य देशातील निर्यात

सोन्याची पदके आणि शिक्के आणि चांदीच्या आभूषणांच्या निर्यातीत क्रमशः 89.4 टक्के आणि 83 टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

भारत जगातील प्रमुख देशामध्ये अमेरिका, युरोप, जपान आणि चीन या देशांना रत्न व आभूषणांची निर्यात करण्यात येते. एकूण निर्यातीत अमेरिकेचा हिस्सा 25 टक्क्यांपर्यंत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related posts: