|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पगार उशीरा येत असल्याने जीवरक्षकांची कळंगूटमध्ये धरणे

पगार उशीरा येत असल्याने जीवरक्षकांची कळंगूटमध्ये धरणे 

प्रतिनिधी /म्हापसा :

जीवरक्षकांना पगार देण्यासाठी दोन ते तीन महिने लावतात याबाबत जाब विचारण्यास कंत्राटदार सरकारकडून अद्याप पैसे आले नाही अशी उत्तरे देतात. आमचा पगार आम्हाला वेळेवर द्या अशी मागणी करत कळंगूट, बागा, सिकेरी, कांदोळी येथील जीवरक्षकांनी कळंगूट समुद्र किनाऱयावर सरकार विरोधात धरणे धरून निषेध व्यक्त केला. कंत्राटदार वेळेवर पगार घालीत नाहीत उलट उडवाउडवीची उत्तरे देऊन कामावर पाहिजे तर रहा अन्यथा सोडून जा अशी धमकी देतात. या कंत्राटदाराला सरकारने काढून टाकावे अशी मागणी करीत समुद्र किनाऱयावरील जीवरक्षकांनी एकत्रित येऊन सरकार व कंत्राटदाराचा निषेध केला.

येथील कंत्राटदार पगार वेळेवर देत नाही. गेल्या दोन महिन्यापासून पगार अद्याप घालण्यात आला नाही. येथे अनेकजण गेलाय पाच ते आठ वर्षापासून कामाला आहे. मात्र सध्या कंत्राटदार पगार न घालता उलट सरकारनेच पैसे दिले नसल्याचे सांगतात. बिले पाठविली तर सरकार दरबारी ती मंजूर केली जात नाही. आम्ही घरात कर्ज काढलेले आहे ते फेडण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहे. अशा परिस्थितीत आम्ही कर्ज कसे भरावे तेथे व्याज वाढते. असे जीवरक्षकांनी बोलताना सांगितले.

सरकारने यात लक्ष घालून आमचा पगार लवकरात लवकर घालावा व आमची सतवणूक करणाऱया कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

 

 

Related posts: