|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » शंभरी ओलांडलेल्या तरुणांसह रंगला ज्येष्ठांचा आनंद मेळावा

शंभरी ओलांडलेल्या तरुणांसह रंगला ज्येष्ठांचा आनंद मेळावा 

पुणे / प्रतिनिधी : 
ज्येष्ठत्व म्हणजे परावलंबन, ज्येष्ठत्व म्हणजे निराशा, ज्येष्ठत्व म्हणजे निरुत्साह असे सर्व गैरसमज खोडून काढत तरुणांनाही लाजवेल अशा सळसळत्या उत्साहात आनंद मेळाव्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठांना आज पुढील जीवनासाठीची सकारात्मक ऊर्जा मिळाली. शंभरी ओलांडलेल्या तरुणांसह ज्येष्ठांचा आनंद मेळावा रंगला.
निमित्त होते जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जनसेवा फौंडेशनसह विविध संस्थातर्फे आयोजित  ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे. जनसेवा फौंडेशन, राज्याचा सामाजिक न्याय विभाग, पुणे महानगरपालिका, आय. एल. सी. (इंडिया), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठाचे समाज विज्ञान केंद्र, फेस्कॉम महाराष्ट्र, अस्कॉप, पुणे, भारतीय योग संस्थान, नवचैतन्य हास्य योग परिवार, एकता योगा ट्रस्ट आणि पुणे शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघ आणि संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते झाले.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी खासदार प्रतापराव भोसले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विकफिल्ड उद्योग समुहाचे अध्यक्ष बहारी बी. आर. मल्होत्रा,  प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार, पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, तसेच सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया,  कृष्णकुमार गोयल,  जनसेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा, दिलीप पवार, विवेक कुलकर्णी, राजेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अरुण माधव रोडे यांना जनसेवा फौंडेशन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच लक्ष्मण गणेश दिनकर (१०७), गंगुबाई भिकोबा निवंगुणे (१०९), डॉ. बळवंत घाटपांडे (१०६), शालिनी चिरपुटकर  (१०२), इंदिराबाई कृष्णा नलावडे (१०६) यांना शतायुषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 80 ते शंभर वयाच्या काही ज्येष्ठ नागरिकांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. 
यावेळी बोलताना  डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले की, समर्पण भावनेने समाजसेवा केल्यास त्याचे फळ निश्चित मिळते. ही सेवा थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते. माणासातील देव ओळखून काम करणाऱ्याला नेहमीच यश मिळते.

Related posts: