|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » विरोधक नसतील तर सभा कशासाठी : जयंत पाटील

विरोधक नसतील तर सभा कशासाठी : जयंत पाटील 

ऑनलाईन टीम / जळगाव :

राज्यात भाजपला जर विरोधकच नसतील तर त्यांच्या नेत्यांनी सभा घेण्याऐवजी घरीच बसावे, ते आपोआप निवडून येतील, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांना जर राज्यात विरोधकच दिसत नसतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 सभा, अमित शहांना 30 सभा आणि मुख्यमंत्र्यांना 100 सभा घेण्याची गरज काय?, त्यांनी न काही करताही ते निवडून येतील. भाजप-सेनेला आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची भिती आहे. त्यामुळे ते शरद पवारांना टार्गेट करत आहेत. शरद पवारांच्या मागे ईडी चौकशी लावून देखील न डगमगता पवारांनी घेतलेली भूमिका युवा वर्गाला भोवली. त्यामुळे राष्ट्रवादीकडे युवा वर्ग आपोआपच ओढला गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.