|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

मुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले 

ऑनलाईन टीम  / पेण : 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेण येथे प्रचार सभेसाठी जात असताना यांच्या हेलिकॉप्टरला आज अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्रा त्याचा पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते.

हेलिगो चार्टर प्रा.लि.चे हे हेलीकॉप्टर होते. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे. 4 वाजून 25 मिनिटे आणि 30 सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे बोलले जाते.

दरम्यान, जिल्हा अधिक्षक अनिल पारसकर म्हणाले, असा कोणताही अपघात झालेला नाही. हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात. मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि पुन्हा काम संपवून परतले आहेत.