|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » नाणार मुद्यावरून सेना भाजप पुन्हा आमने सामने

नाणार मुद्यावरून सेना भाजप पुन्हा आमने सामने 

ऑनलाईन टीम  / मुंबई : 

नाणारच्या मुद्यावरून सेना भाजपा पुन्हा आमने सामने आले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारच्या मुद्यावर भाजपला फटकारलं आहे. शिवसेना नाणारला एकदा घालवल्यानंतर परत प्रकल्प आणण्यासाठी कबुली देणार नाही. आम्ही एकदा प्रकल्प घालवला म्हणजे घालवला असे वक्तव्य सुभाष देसाई यांनी केले आहे.

सर्वच पक्षांच्या नेतृत्वाच्या सहमतीने नाणार प्रकल्प आम्ही आणू, अशी माहिती भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नाणारचा मुद्दा गाजणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर नाणारच्याबाबतीत लोकांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समजून घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पार्श्वभुमीवर देसाई यांनी हे वक्तव्य केले आहे.