|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » उद्योग » सन 2018-19 मध्ये एलआयसीकडून 50 कोटी बोनसचे वाटप

सन 2018-19 मध्ये एलआयसीकडून 50 कोटी बोनसचे वाटप 

वृत्तसंस्था/ मुंबई

सन 2018-19 या अर्थिक वर्षात एलआयसीने पॉलिसीधारकांना तब्बल 50 कोटी रुपयाचा बोनस वाटल्याचे एलआयसीने स्पष्ट केले आहे. एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून सातत्याने एलआयसी तोटय़ात असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर जाणीवपूर्वक शेअर केली जात आहे. भागधारक आणि पॉलिसीधारकांच्या मनातून एलआयसी ब्रँडचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत एलआयसीने गेल्या वर्षभरात केलेल्या व्यवसायाची माहिती समोर ठेवली आहे. त्यानुसार गेल्या आर्थिक वर्षात पॉलिसीधारकांना आतापर्यंतचा सर्वाधिक बोनस वाटताना एलआयसीने तब्बल 50 हजार कोटी रुपयाहून अधिक रकमेचे वाटप केले आहे. तसेच 31 ऑगस्टपर्यंत एलआयसीच्या बाजारातील पॉलिसीचे भाग(शेअर) 72.84 टक्के असून पहिल्या वर्षाचा प्रिमियम 70.3 टक्के इतका आहे. महत्वाची बाब म्हणजे 31 मार्चपर्यंत 66.24 टक्के असलेला प्रिमियम 31 ऑगस्टपर्यंत 73.06 टक्क्यापर्यंत वाढल्याने एलआयसी आर्थिकदृष्टय़ा अधिक सक्षम झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे कार्यकारी संचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Related posts: