|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » उद्योग » प्रवासी वाहन विक्री सप्टेंबरमध्ये 23.7 टक्क्यांनी घटली

प्रवासी वाहन विक्री सप्टेंबरमध्ये 23.7 टक्क्यांनी घटली 

सलग 11 व्या महिन्यात विक्रीत घसरण नोंदवली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मागील काही महिन्यांपासून वाहनांच्या विक्रीत सलग घसरणीचे सत्र सुरु असून पुन्हा सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीत 23.69 टक्क्यांनी घसरण होत 2 लाख 23 हजार 317 युनिट्वर विक्री राहिली आहे. मागील सप्टेंबरमध्ये हाच आकडा 2 लाख 92 हजार 660 प्रवासी वाहनांची विक्री झाल्याची नोंद केली होती. सलग 11 व्या महिन्यातही वाहनांची विक्री घसरली असल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (एसआयएएम) ने शुक्रवारी सादर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट केले आहे.

एकूण घट

सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री 22.41 टक्क्यांनी घट होत 20 लाख 04 हजार 932 वर राहिली आहे. मागील सप्टेंबरमध्ये हाच आकडा 25 लाख 84 हजार 62 इतका होता.

अर्थमंत्र्याचे आश्वासन 

देशभरातील वाहन क्षेत्रातील तज्ञासोबत सध्या विविध विषयावर चर्चा करत असून वाहन कंपन्यांना येत्या काळात दिलासा देण्यासाठी योग्य उपाययोजना तयार करण्याची आम्ही प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.

Related posts: