|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सावळजमध्ये पावसाने सुरक्षा ग्रील तुटुन पुलही खचला

सावळजमध्ये पावसाने सुरक्षा ग्रील तुटुन पुलही खचला 

सावळज-बिरणवाडी पुल तीन वेळा पाण्याखाली

वार्ताहर / सावळज

            परतीच्या पाऊस सावळज परीसराला दररोजच झोडपु लागल्याने अग्रणीनदीवरील सावळज बिरणवाडी रस्त्यावरील पुल तीन वेळा पाण्याखाली गेला आहे.  नदीच्या जोरदार पावसाच्या प्रवाहामुळे पुलाचा मध्यभाग खचला आहे. तर पाण्यातुन  वाहत आलेल्या झाडेझुडपामुळे पुलाचे सुरक्षा कटडय़ासह लोखंडी ग्रील तुटुन पुल धोकादायक बनला आहे. त्यामुळे पुलावरुन वाहतुक बंद झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थी वर्गाची गैरसोय झाली. तुफानी पावसामुळे शेतकऱयांच्या जनावरे ही नदीच्या पुरातुन वाहुन मुत्युमुखी पडली ती दोन मुत्यु जनावरे या पुलावर अडकली होती

            गेली आठ दिवस परतीच्या मुळसधार पावसाने सावळज परीसरातील अग्रणी नदीला पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे परीसरातील नदीवरील अनेक पुल पाण्याखाली गेल्याने प्रवाशांना व विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. अचानक पुलावरुन वाहतुक थांबविल्याने अनेकांची गैरसोय झाली. गेली दोन दिवस या नदीच्या पुरात वाहत आलेली मोठी झाले व झुडपे पुलामध्ये अडकली होती. ती जेसीबीच्या साह्याने स्वच्छता करण्याचे काम संबंधित बांधकाम विभागाने केले. सावळज बिरणवाडी रस्त्यावरील पुलाचे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नुकसान झाले आहे. एस टी महामंडळाने परीसरातील पुल पाण्याखाली गेल्याने अचानक मार्ग बदल्याने प्रवाशांना त्रास झाला. गव्हाण मणेराजुरी पुलावर ही पाणी असल्याने दिवसभर हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

            पुरात जनावरे ही मुत्यृमुखी

            अग्रणी नदीच्या पुरात शेतकऱयांच्या दोन म्ह्wशी ही मुत्युमुखी पडल्या आहेत. गुरुवारी रात्री पडलेल्या पावसातुन दोन मुन्युमुखी पडलेल्या दोन म्हैशी वाहत येवुन पुलाजवळ अडकल्या होत्या. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा येत असल्याने सावळजच्या काही युवकांनी खोल पाण्यात जावुन मृत जनावरे व झाडे झुडपे काढण्याचे धाडसी काम केले.

Related posts: