|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » काँग्रेसच्या अलगोंडा-पाटलांचे ‘दक्षिण’ला ‘राजीनाम्या’ने उत्तर

काँग्रेसच्या अलगोंडा-पाटलांचे ‘दक्षिण’ला ‘राजीनाम्या’ने उत्तर 

न्याय न मिळाल्याने महिला काँग्रेस  जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

प्रतिनिधी/ सोलापूर

दक्षिण सोलापूर मतदारसंघातून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा-पाटील या इच्छुक होत्या. परंतु नगरसेवक बाबा मिस्त्राr यांना उमेदवारी दिली. बाबा मिस्त्राr यांना विरोध नाही. परंतु आपण पक्षासाठी गेली 40 वर्षे कार्यरत आहोत. तरीदेखील पक्षाने आणि वरिष्ठ नेत्यांनी आपला विचार केला नाही. निष्ठावंतांना विश्वासात न घेता वरिष्ठांनी परस्पर निर्णय घेतले. त्यामुळे त्यांनी ‘दक्षिण’ला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षापदाचा ‘राजीनामा’ देत उत्तर दिले.

   इंदुमती अलगोंडा-पाटील यांनी सात रस्ता येथील निवासस्थानी शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेउढन राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी अलगोंडा-पाटील म्हणाल्या, मी पण सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आहे. गेली 40 वर्षे काम करून माझं काही चुकलं असेल, तर पक्षाने, वरिष्ठांनी सांगावे. पक्षासाठी काम करून आमचा एकदाही विचार केला जात नाही. त्यामुळे मी काँग्रेसमधील सर्वच वरिष्ठांवर नाराज आहे.

    विधानसभेच्या निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. यापूर्वी तीनवेळा मागणी केली होती. परंतु आजपर्यंत मला एकदाही उमेदवारी दिली नाही. उमेदवारी दिली असती, तर आजपर्यंत केलेले कार्य, जनसंपर्क पाहता नक्कीच निवडून आले असते. दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी देऊन सामाजिक काम करण्याची संधी दिली नाही. आधी समाजकारण आणि नंतर राजकारण अशा रितीने काम करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. त्यामुळे आपण सोलापूर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे यावेळी इंदुमती अलगोंडा-पाटील यांनी जाहीर केले.

सध्या कोणत्याच पक्षात जाणार नाही

-मी पण सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आहे. परंतु माझा कधी विचार झाला नाही. वारंवार अन्याय झाला. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. तसेच सध्या तरी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा लवकरच ठरवणार असल्याचे इंदुमती अलगोंडा-पाटील यांनी सांगितले.