|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अथणी भागात अग्रणी नदीस पूर

अथणी भागात अग्रणी नदीस पूर 

वार्ताहर/ अथणी

तालुक्याच्या उत्तर भागात 20 वर्षानंतर प्रथमच सतत आठ दिवस रात्रीच्या वेळी  मुसळधार पाऊस होत असल्याने अग्रनी नदी भरुन वाहात आहे. त्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीस बंद आहेत. अनेक गावात घरांची पडझड झाली आहे. तर अतिवृष्टीने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या दिवसभर कोरडे वातावरण रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस होत आहे. जुनी घरे पडली आहेत. आजूर, संबरगी, कलोती, तावशी, अनंतपूर, बेवनूर रस्त्यावर असणाऱया पुलावरुन पाणी वाहात आहे. 20 वर्षानंतर मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला आहे. अग्रनी नदीस येणारे पाणी पाहण्यासाठी नदीकाठावर नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. रब्बीची पेरणी करण्यास शेतकरी सज्ज होता. परंतु पावसाने जमिनीत ओल अधिक आहे. त्यामुळे पेरणी कामे खोळंबली आहेत.

Related posts: