|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पीएमसी बँक घोटाळा: राज ठाकरे काढणार तोडगा?

पीएमसी बँक घोटाळा: राज ठाकरे काढणार तोडगा? 

मुंबई : प्रतिनिधी

सप्टेंबर महिन्यात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले. त्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे पीएमसी बँकेचे खातेदार आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.

गुरुवारी मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पीएमसी बँकेच्या गैर व्यवहारावर भाष्य करत सरकारवर आरोपही केला. या सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून 1 लाख 70 हजार कोटी सरकार चालवण्यासाठी काढले. या सगळ्यावर आता खातेदार हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता पीएमसीच्या या घोळावर तोडगा काढणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.