|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » नवनवीन तंत्रज्ञान, डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी : डॉ. यशवंत माने

नवनवीन तंत्रज्ञान, डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी : डॉ. यशवंत माने 

पुणे / प्रतिनिधी : 

बदलती जीवनशैली, कामाचा ताण-तणाव, अल्कोहोल, तंबाखूचे सेवन आणि लठ्ठपणा यामुळे देशभरातील वंध्यत्वामध्य दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्याशिवाय पॉली-सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, एंडोमेट्रियल क्षयरोग आणि लैंगिक संक्रमणामुळे देखील वंध्यत्वाला सामोरे जावे लागते.

पूर्वी वंध्यत्वावर फार कमी उपचार पद्धती अस्तित्वात होत्या त्यामुळे स्त्रियांमधील वंध्यत्व दूर होणे अतिशय कठीण बाब होती त्यामुळे अनेक स्त्रीयांना मातृत्वाच्या सुखापासून वंचित राहावे लागत असे.  परंतु आता वंधत्व चिकित्सा व उपचार या क्षेत्रामध्ये खूपच क्रांतिकारकरित्या नवनवीन शोध लागले आहेत जेणेकरून अतिशय अवघड किंवा क्लिष्ठ कारणामुळे निर्माण झालेल्या वंधत्वावर मात करून अपत्यहीन जोडप्यांना आशेचा नवा किरण दिसू लागला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना एंडोस्कोपी आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. यशवंत माने म्हणाले की, “संशोधनानुसार असे आढळले आहे की नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे आणि नाशिक येथे  मिळून  १,००० लाइव्ह टेस्ट-ट्यूब बाळांचा आकडा ओलांडला आहे.

यावेळी बोलताना साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ. नीरज आडकर म्हणाले की, “विविध कारणांमुळे वंध्यत्वाच्या समस्येसाठी आयव्हीएफ हा एक उपाय आहे. भारतात, वंध्यत्व समस्यासाठी कायमस्वरुपी उपाय म्हणून आयव्हीएफकडे पहिले जाते. आयव्हीएफ मुळे अनेक जोडपी हळूहळू जागरूक होऊन या प्रक्रियेची निवड करत आहे.  ते  पुढे म्हणाले की, “अनेकदा जोडप्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळेच वंध्यत्वासाराखी समस्या निर्माण होते. परंतु आयव्हीएफ उपचार हा अनेक जोडप्यांसाठी वरदान ठरलेला आहे.  

Related posts: