|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » राज डागणार प्रत्येक भाषणात पीएमसी घोटाळ्यावर तोफ

राज डागणार प्रत्येक भाषणात पीएमसी घोटाळ्यावर तोफ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या अडचणींचा पाढा वाचला.

काही दिवसांपूर्वीच पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदारांना व्यवहार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच खातेधारकांना पैसे काढण्यास मर्यादा असल्याने खातेदार हैराण झाले आहेत. अडचणींच्या काळात पैसे काढता येत नसल्याने त्यांनी त्यांचे गाऱहाणे आज राज यांच्यापुढे मांडले. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते.

पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा असल्याने काहींना हॉस्पिटलचे बील भरणे अवघड झाले. तर कोणाला आपल्या मुला-मुलींची लग्न पुढे ढकलावी लागली आहेत. तर कोणाला दागिणे गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. त्यावर राज यांनी खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचे व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळय़ावर बोलण्याचे आश्वासन या महिलांना दिले आहे.