|Friday, October 18, 2019
You are here: Home » leadingnews » कुस्ती पैलवानांसोबत होते इतरांसोबत नाही : शरद पवार

कुस्ती पैलवानांसोबत होते इतरांसोबत नाही : शरद पवार 

ऑनलाइन टीम / सोलापुर : 

कुस्ती तर पैलवानांसोबत होते इतरांसोबत नाही असा टोला शरद पवारांनी हातवारे करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बार्शी इथं झालेल्या जाहीर सभेत आज शरद पवारांचे भाषण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत आमच्यासमोर कोणी पैलवानच नाही. समोर लढण्यासाठी कोणी विरोधकच उरला नाही असा टोला लगावला होता. पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही.

हे वाक्य बोलताना पवार यांनी विशिष्ट प्रकारे हातवारे केले. पवारांच्या भाषणाचं चित्रण करणाऱया टीव्ही कॅमेऱयांनी ते हातवारे टिपले. काही वेळातच ते सर्वत्र व्हायरल झाले आणि चर्चेला उधण आलं. 370 कलमावर ओरडणारे 371 कलमावर गप्प का? असा थेट सवाल शरद पवारांनी अमित शहांना विचारला आहे.

दरम्यान भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण म्हणाले, इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसानं असं करणं शोभत नाही. त्यांचा तोल आधीच गेलाच होता, आता पराभवाच्या भीतीनं ते अधिकच बिथरले आहेत.