|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » औंध येथे दोन गटांत तुफान राडा ; एकाचा खून

औंध येथे दोन गटांत तुफान राडा ; एकाचा खून 

पुणे / प्रतिनिधी : 

औंध येथे दोन गटांत शुक्रवारी रात्री तुफान हाणामारी झाली. यामध्ये एका रिक्षा चालकाचा कोयता आणी लोखंडी रॉडने वार करुन खून करण्यात आला. तर इतर तीन ते चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांती परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्या आहेत. त्यानूसार खुन आणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाले आहेत.

रफीक लाला शेख (27,रा.चंदन सोसायटी, नागरस रोड, औंध) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी रफीकच्या भावाने फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनूसार जुन्या भांडणाच्या कारणावरुन हर्ष इमारतीच्या जवळील मांडवाच्या बाजूला आरोपी इम्रान यूसूफ शेख, शुभम भिसे, उमेश धर्मेंद्र, इरफान यूसूफ शेख, यूसूफ हुसेन शेख यांनी तलवार, लोखंडी कोयता, लोखंडी रॉड याने फिर्यादीचा भाऊ रफिक याच्यावर हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. रफीकला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषीत करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे उपायुक्त, खडकी विभागाचे सहायक पोलीस उपायुक्त बोराटे, सहायक पोलीस उपायुक्त(वाहतूक) गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, एस.डी.पवार, माळेगावे आदी घटनास्थळी दाखल झाले होते.

 

Related posts: