|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » संपत्तीसाठी मुलीने दिला आईस झोपेच्या गोळय़ांचा ओव्हरडोस

संपत्तीसाठी मुलीने दिला आईस झोपेच्या गोळय़ांचा ओव्हरडोस 

पुणे / प्रतिनिधी : 

संपत्तीसाठी बहिणीने आईस झोपेच्या गोळय़ांचा ओव्हरडोस दिला. यामुळे आईचा मृत्यू झाल्याची तक्रार एका व्यापाऱयाने फरासखाना पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानूसार संबंधीत बहिणीविरुध्द फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आनंद श्रवणकुमार पटेल(45,रा.शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. तर शारदाबेन पटेल असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका 48 वषीय महिलेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी व आरोपी सख्खे भाऊ-बहिण आहेत. दोघांचाही पुण्यामध्ये व्यवसाय आहे. त्यांची आई आजारी पडल्यावर फिर्यादीच्या बहिणीने रुग्णालयात दाखल करुन उपचार केले.उपचारादरम्यान नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच फिर्यादीला देखील भेटून दिले नव्हते.

Related posts: