|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » नगरसेविका सीमा सावळे यांची भाजपमधून हकालपट्टी

नगरसेविका सीमा सावळे यांची भाजपमधून हकालपट्टी 

पिंपरी / प्रतिनिधी : 

पक्षादेश डावलून विधानसभा निवडणुकीत अमरावती जिह्यातील दर्यापूर मतदारसंघातून भाजप उमेदवाराच्या विरोधातच बंडखोरी केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन नगरसेवक बंडखोरी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भाजप नगरसेविका सीमा सावळे आणि भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने ओव्हाळ यांची यापूर्वीच हकालपट्टी केली आहे. तर, कलाटे यांचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

स्थायी समितीच्या माजी सभापती असलेल्या सीमा सावळे या अमरावती जिह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. भाजपने तिथे विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याने सावळे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

Related posts: