|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News »  विचारधारेपासून दूर गेल्यानेच आघाडीतून पक्षांतर : प्रकाश जावडेकर

 विचारधारेपासून दूर गेल्यानेच आघाडीतून पक्षांतर : प्रकाश जावडेकर 

पुणे / प्रतिनिधी : 

काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष विचारधारेपासून दूर गेले असून, त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे त्या पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपात आलेले सर्व नेते चांगले असल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जावडेकर म्हणाले, काँग्रेस आणि भाजपमध्ये दोन गोष्टींचा फरक आहे. एक म्हणजे आम्ही कोणत्याही निवडणुकीत विजयी झाल्यावर आमच्या योजना जोरदारपणे राबवितो. आमचा पक्ष 24 तास काम करणारा आहे. परंतु काँग्रेसला निवडणूक किंवा त्यानंतर त्यांचा काही कार्यक्रम दिसत नाही. आता तर काँग्रेसच्या अध्यक्षांचादेखील पत्ता नाही. राहुल गांधीही लोकसभेच्या निवडणुकीनंतर गायबच आहेत. घराणेशाही, भ्रष्टाचार, व्होटबँक पॉलिटिक्स आणि वैचारिक दिवाळखोरी यामुळे जनतेच्या मनातून काँग्रेस उतरली आहे. तसेच त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे त्यांचे नेतेदेखील दूर होत आहेत.

Related posts: