|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » …तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही : पंकजा मुंडे

…तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही : पंकजा मुंडे 

ऑनलाइन टीम / बीड : 

जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा निश्चय भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आज, शनिवारी जाहीर सभेत बोलून दाखवला. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

माझ्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हे काही नवीन स्व.गोपीनाथ मुंडे असताना देखील सगळे लक्ष लागायचे राष्ट्रवादीची लोक खोटा प्रचार करतात की पंकजा मुंडेना भीती वाटते. मी महाराष्ट्रात प्रचार करुन माझा मतदारसंघ सांभाळते मला चिंता महाराष्ट्राची आहे. बीड जिह्यात एकही बंडखोरी नाही. पाच वर्षांत पालकमंत्री असताना बीड जिह्यात कारभार नाही तर संसार केला, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडेसारखे कर्तृत्वान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी केली. माझी निवडणूक काही अवघड नाही. विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.