|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आचऱयातील युवकांची समुद्र किनाऱयावर स्वच्छता मोहीम

आचऱयातील युवकांची समुद्र किनाऱयावर स्वच्छता मोहीम 

वार्ताहर / आचरा:

 आचरा समुद्र किनाऱयावर मोठय़ा प्रमाणात कचरा साठला होता. रविवारी 42 दिवसाच्या रामेश्वर संस्थानच्या श्री गणपतीचे विसर्जन सोहळाही होणार आहे. म्हणून आचरा येथील पत्रकार परेश सावंत, उदय बापर्डेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी किनाऱयावर स्वच्छता मोहीम राबवण्याचे ठरवले. शनिवारी सकाळी 7 वाजता स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पत्रकार परेश सावंत, उदय बापर्डेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांच्यासमवेत व्यापारी संघटनेचे खजिनदार जयप्रकाश परुळेकर, यशराज संघटनेचे मंदार सारजोशी, निखिल ढेकणे, पंकज आचरेकर, संदीप नलावडे, रोहित भिरवंडेकर, अवधूत हळदणकर, मुजफ्फर मुजावर आदींनी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी मोठय़ा प्रमाणात कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावून किनारा स्वच्छ करण्यात आला.