|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » परप्रांतीय निराधार वृद्धा संविता आश्रमात

परप्रांतीय निराधार वृद्धा संविता आश्रमात 

प्रतिनिधी / ओटवणे:

माजगाव नाला येथे गेल्या दोन दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय निराधार वृद्धेला अखेर पणदूर येथील संविता आश्रमचा आधार मिळाला असून अन्न, पाणी, वस्त्रासह निवाऱयाअभावी होणारी या वृद्धेची गैरसोय दूर झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून या निराधार वृद्धेच्या माजगाव-नाला परिसरात वावर होता. मनोरुग्ण असलेल्या या वृद्धेला मराठी, भाषा समजत नव्हती. त्यामुळे ती परप्रांतीय असल्याचे स्पष्ट झाले. ही वृद्धा अन्नपाण्यासाठी ही वृद्धा दिवसभर भ्रमंती केल्यानंतर रात्रीच्यावेळी रस्त्यालगतच्या एका दुकानाबाहेर झोपायची.

या निराधार वृद्धेची माहिती माजगाव ग्रामपंचायतीने लिपीक गुरुनाथ घाडी यांनी माजी उपसरपंच हेलन निब्रे याना दिल्यानंतर त्यांनी त्याची माहिती सावंतवाडी पोलीस स्थानकात दिली. यावेळी पोलीस व्हॅनसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. त्यानंतर हेलन निब्रे यानी संविता आश्रमचे संचालक संदीप परब यांना फोन करून या वृद्धेला संविता आश्रमात आश्रय देण्याची विनंती केली. त्यानंतर पोलीस व्हॅनने या वृद्धेला पणदूर येथे नेण्यात आले. यावेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या वृद्धेला संविता आश्रमचा आश्रय मिळाला. सेवाभावी वृत्तीच्या हेलन निब्रे यांनी यासाठी पुढाकार घेऊन दाखविलेल्या समाजसेवेचे माजगावातून कौतुक होत आहे.