|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रेडी चेकपोस्टवर दारू जप्त

रेडी चेकपोस्टवर दारू जप्त 

वार्ताहर / वेंगुर्ले:

रेडी चेकपोस्टवर गोवा बनावटी साडेअकरा हजारांच्या दारूसह गाडी असा 81 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल वेंगुर्ले पोलीस व निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकाने संयुक्त कारवाई करून जप्त केला. ही कारवाई शनिवारी सकाळी सव्वा चार वाजता करण्यात आली. याबाबत वेंगुर्ले-आनंदवाडी येथील गणेश बाबुराव जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवर सर्व गाडय़ांची कसून तपासणी होत आहे. मिळालेल्या महितीनुसार पोलिसांकडून सापळा रचून कारवाई केली. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय नाईक, रेडी चेकपोस्ट पोलीस नाईक जितेंद्र कोलते, पोलीस नाईक सुरेश पाटील, काँस्टबल सुरज रेडकरसह निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकप्रमुख अजय नाईक यांनी ही कारवाई केली. यावेळी तेरेखोल दिशेकडून येणारी अल्टो कार (एम. एच.-07 एच. 1989) थांबवून तिची तपासणी केली असता गोवा बनावटीची सुमारे 11 हजार 400 रुपयांची दारूसह 70 हजारांची कार असा 81 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.