|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बाव येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

बाव येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या 

वार्ताहर / कुडाळ:

बाव-देऊळवाडी येथील उल्हास सत्यवान बावकर (40) यांनी आपल्या राहत्या घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

उल्हास मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. त्यांना दारुचे व्यसन होते. शुक्रवारी रात्री जेवण करून ते आपल्या घरातील खोलीत झोपले. शनिवारी सकाळी ते उठले नाहीत, म्हणून त्यांचे वडील त्या खोलीत गेले असता उल्हास यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. स्टुलचा आधार घेत नायलॉन दोरीने लाकडी बाराला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. ही घटना समजताच सरपंच नागेश परब व ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पोलिसांना याबाबत कल्पना देताच कुडाळ पोलीस ठाण्याचे हवालदार एस. एन. टाकेकर व प्रीतम कदम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव घुर्ये यांनी विच्छेदन केले. नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उल्हास यांच्या पश्चात आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. कुडाळ येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचारी सत्यवान बावकर यांचे ते पुत्र होत.