|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नानोडा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात 11 फुट लांबीचा किंग कोब्रा पकडला

नानोडा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात 11 फुट लांबीचा किंग कोब्रा पकडला 

वाळपई /  प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील नानोडा याठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या आवारात 11 फूट लांबीच्या किंग कोब्रा पकडण्यात आल्याची घटना घडली आहे .सर्पमित्र प्रदीप गंवडळकर यांनी आज सकाळी अकरा फूट लांबीचा किंवा पकडला.

 यासंदर्भाची माहिती अशी की सदर परिसरामध्ये किंग कोब्रा असल्याची माहिती सर्पमित्र प्रदीप गंवडळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. झाडाझुडपामध्ये लपलेल्या किंग कोब्राला त्यांनी हुडकून काढले. अत्यंत आक्रमक पद्धतीने व चपळाईने पळत असलेल्या किंग कोब्रा शेवटी प्रदीप यांच्या हातात लागला .प्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर किंग कोब्रा 11 फूट लांबीचा असून आतापर्यंत यापूर्वी सदर परिसरामध्ये दोन किंग कोब्रा पकडण्यात आलेले आहेत.पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या यापरिसरात मोठय़ा प्रमाणात झुडपे वाढली असून यामुळे सदर ठिकाणी जनावरांना राहण्याची संधी प्राप्त होत असते. यामुळे रानटी जनावरे याभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात संचार करीत असल्याचे यावेळी नागरिकांनी स्पष्ट केले. सर्पमित्र प्रदीप  यांनी गेल्या चार दिवसात मलपण पैकुळ, व कुडसे आदी गावांमध्ये प्रत्येकी एक असे तीन किं?ग कोब्रा पकडलेले आहेत.आज पकडण्यात आलेल्या किंग कोब्रा म्हादई अभयारण्य परिक्षेत्राच्या वन अधिकाऱयाकडे देण्यात आल्याचे यावेळी श्री गंवडळकर यांनी स्पष्ट केले.