|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आमदार अपात्रता याचिकेवर 15 रोजी सुनावणी

आमदार अपात्रता याचिकेवर 15 रोजी सुनावणी 

प्रतिनिधी/ पणजी

काँग्रेसला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या 10 आमदारांविरोधात सभापतींकडे दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. काँग्रेसने या 10 आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती.

माजी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील 10 आमदारांचा गट फुटला होता आणि भाजपमध्ये दाखल झाला होता. या 10 आमदारांविरोधात काँग्रेसने अपात्रता याचिका दाखल केली आहे. भाजपवासी झाल्यानंतर यापैकी तीन आमदारांना मंत्रिपदे मिळाली होती. तर अन्य काही आमदारांना महामंडळे देण्यात आली होती. काँग्रेसमधील 15 पैकी 10 आमदार फुटल्याने त्यावेळी काँग्रेसला जबर धक्का बसला होता. यामुळे केवळ 5 आमदार काँग्रेसमध्ये शिल्लक राहिले आहेत. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल 17 आमदार निवडून आले होते, मात्र अगोदर पक्षाचे तीन आमदार फुटले व त्यानंतर 10 आमदार फुटले. त्या दहा आमदारांविरोधात काँग्रेसने अपात्रता याचिका दाखल केली होती. सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर 15 रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.